विभागीय स्पर्धासाठी चि. शिवराज गायकवाड याची निवड
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क-आंबेजोगाई येथील क्रीडा संकुलातील महाविदयालच्या मैदानावर जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या आहेत.या स्पर्धांत राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. पोदार शाळेतील चि. शिवराज रंजीत गायकवाड याची विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.
या गुणवंत खेळाडूंचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशस्वी खेळाडूच्या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मार्गदर्शक क्रिडाशिक्षक सूर्यकांत घोलप यांचे ही राजस्थानी पोदार स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले.