खालापूरी येथे जुगार अड्ड्यावर छापा, 12 जुगारी व सुमारे 4 लाख 25 हजाराचा चा मुद्देमाल जप्त

जुगार

बीड/ शिरूर – एम एन सी न्यूज नेटवर्क- जिल्हा पोलीस अधीक्षक पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील खालापूरी येथे या पथकाकडून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये 12 जुगारी व सुमारे 4 लाख 25 हजाराचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेविरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथका मार्फत सपोनी गणेश मुंडे यांच्या टीमने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि.5 ऑक्टोबर गुरुवार रोजी सायं. 5 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी घटना स्थळावर 12 जुगारी, 7 मोटारसायकल व रोख 4 लाख 25 हजाराची रक्कम जप्त करण्यात आली. पथका मार्फत छाप्याची माहिती शिरूर पोलीसांना कळविल्या नंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले होते.