टोमॅटोचे भाव मात्र गडगडले.
नाशिक/दिंडोरी (Nashik) एम एन सी न्यूज नेटवर्क- : सुमारे दोन ते तीन महिन्यापूर्वी टोमॅटोचा उच्चांकी दर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. त्यामुळे बाजारात आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव मात्र गडगडले.जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात टोमॅटोला योग्य दर मिळत नसताना शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आंदोलन करण्यात येत असून दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोर टोमॅटो रस्त्यावर फेकले. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला. टोमॅटोला योग्य तो दर मिळत त्यावेळी टोमॅटोला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
टॉमॅटोला बाजारभावाने मारलं अशीच परिस्थिती सध्या नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांची झाली आहे. सुमारे दोन ते तीन महिन्यापूर्वी टोमॅटोचा उच्चांकी दर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड करण्यात आली. मात्र त्यामुळे बाजारात आवक वाढल्याने टमाट्याचे भाव मात्र गडगडले.
तीन महिन्यापूर्वी काही शेतकऱ्यांना टोमॅटो पिकाने लखपती बनवले असले तरी हजारो शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता कर्जबाजारी करण्याचं काम टोमॅटो मुळे झाले आहे. सध्या मिळत असलेला बाजार भाव ७० ते १०० रुपये कॅरेट यात साधा टोमॅटो खुडण्याचा आणि बाजारात नेई पर्यंतचा खर्च सुद्धा निघत नाही . टोमॅटो लागवडी पासून ते बाजारापर्यंत नेण्यापर्यंत भांडवला बरोबरच मोठे कष्ट देखील आहे. मात्र या कष्टाचे चीज शेतकऱ्याचे होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक शेतातून काढून फेकण्यास सुरुवात केली आहे.