मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा आता छत्रपती संभाजीनगर मध्ये

संग्रहित छायाचित्र

🔸 भारत श्री, 🔸महाराष्ट्र श्री या स्पर्धेचेही आयोजन.

छत्रपती संभाजीनगर/ एम एन सी न्यूज नेटवर्क-  शरीर सौष्ठव या प्रकारात आता युवकांचा मोठा उत्साह वाढला आहे. या स्पर्धा मोठ्या महानगरातच व्हायच्या मात्र आता आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजी नगर मध्ये दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान मिस्टर युनिव्हर्स ची जागतिक आंतरराष्ट्रीय शरीर संस्था स्पर्धा रंगणार आहे.

25 ऑक्टोबर च्या दरम्यान ज्युनिअर भारत श्री आणि वरिष्ठ भारत श्री तर 26 ऑक्टोबर रोजी शरीर सौष्ठव प्रकारात इतर गटांचा आयोजन होणार असल्याची माहिती भारतीय बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशनचे सरचिटणीस डॉ. संजीव मोरे यांनी दिली आहे. मिस्टर युनिव्हर्सरी स्पर्धेसाठी जगातील 50 पेक्षा अधिक देश तसेच भारत आणि महाराष्ट्रातील सुमारे 700 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी नगर मधील एमजीएम आणि विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे. एकूणच छत्रपती संभाजी नगर शहरात होत असणाऱ्या या पाच स्पर्धांचे आयोजन हीच युवकांना मोठी संधी आहे. या स्पर्धेत सुमारे 2000 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होतील अशी अपेक्षा संजय मोरे यांनी व्यक्त केली आहे. 2009 मध्ये आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धा, त्याचप्रमाणे 2011 मध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि 2019 मध्ये डायमंड चषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आलेला आहे. यावेळी फेडरेशनचे कोषाध्यक्ष राजेश सावंत, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र सातपूतकर, नरेंद्र कदम, राजेश सावंत, नंदकुमार खानविलकर, आदी उपस्थित होते.