परळी बसस्थानकासमोर फायर

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क-:-  परळी शहरातील बसस्थानकासमोर अज्ञाताकडून गोळीबार केल्याची घटना घडल्याची शहरात वाऱ्यासारखी पसरली. दिवसभर शहरात गोळीबार झाल्याची चर्चा सुरू होती. परंतु या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सदरील घटनेमुळे परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान परळी शहर पोलिसांना संपर्क केला असता रिवाल्वरधारक यांच्याकडून चुकून रिवाल्वर लॉक करत असताना फायर झाल्याचे सांगण्यात आले.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, परळी बस स्थानकाच्या लगतच असलेल्या एका दुकानासमोरच हवेत फायर झाल्याचे वृत्त परळी शहरात पसरले. गोळीबार घटनेत एक गोळी दोन दुकानाच्या आरपार घुसली. दोन्ही बाजूने हॉटेल असून या हॉटेलच्या भिताडामध्ये पत्राचे शेड फाडून गोळी बाहेर निघाली. तसेच एका हॉटेलच्या काचेवरही गोळी लागल्याने तडा गेल्याचेही दिसून येत आहे. सदरील गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच बस स्थानक परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

————————————

परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र सानप यांच्याकडून अधिकृत माहिती घेतली असता संबंधित रिवाल्वरधारक अनिल मुंडे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात येवून माझ्याकडून रिवाल्वर लॉक करत असताना चुकून हवेत बाहेर झाल्याचे सांगितले.