उद्या बीडमध्ये प्रकाश आंबेडकरांची तोफ कडाडनार…

काय बोलणार प्रकाश आंबेडकर याकडे महाराष्ट्राचे लक्ष..

बीड/एम एन सी न्यूज नेटवर्क-: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये परिवर्तन महासभा उद्या बीडमध्ये संपन्न होणार आहे यामध्ये याआधी देखील लातूरच्या सभेतही मोदींवर हल्ला करत कुठल्याही परिस्थितीत मोदी यांना पंतप्रधान होऊ देणार नाही अशी कडाडक ललकारी लातूरच्या परिवर्तन महासभेतून प्रकाश आंबेडकरांनी केली होती आता यापुढे नेमकं प्रकाश आंबेडकर बीडच्या सभेतून काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

बीडमध्ये प्रथमच होत असलेल्या बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ही रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचं कार्यकर्ते सांगत आहेत त्याचबरोबर सध्या राज्यातील राजकारणावर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत यावरच प्रकाश आंबेडकर यांनी अनेक ठिकाणी आपल्या भाषाशैलीतून कडक तोफी काढाव्यात कशा पद्धतीने वक्तव्यही केले आहेत मात्र आता बीड जिल्ह्यात होत असलेली त्यांची सभा ही महाराष्ट्रभर गाजणार आणि यासाठी मोठ्या संख्येने या सभेला नागरिकांची गर्दी ही होणार असंही सभा नियोजकांनी या वेळेस सांगितला आहे मात्र आता उद्याच्या बीडच्या सभेत प्रकाश आंबेडकर हे काय बोलणार याकडेच आता लक्ष लागून राहिला आहे बीडमध्ये उद्याची सभा होणार असल्याने जिल्हाभरात मोठ्या जैत तयारीची सुरुवात ही आता संपन्न होत आहे जिल्हाभरात बॅनरबाजी बाळासाहेब आंबेडकरांची स्वागताची तयारी ही सुरू झाली आहे. याचबरोबर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभरातून या ठिकाणी नागरिक या सभेला हजेरी लावणार असल्याचाही यावेळेस नियोजकांनी सांगितला आहे.