राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड 

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- परभणी येथे (दि 8) ऑक्टोबर रविवार रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्केटिंग स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत यशस्वी होऊन हिमाचल प्रदेश येथे भारत सरकारच्या खेलो इंडिया खेलो राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळण्यास निवड झाली आहे. अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.
भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने हिमाचल प्रदेश येथे होत असलेल्या खेलो इंडिया या स्पर्धेतील स्केटिंग स्पर्धेसाठी राजस्थानी पोदार लर्न स्कूलचे विद्यार्थी आयुष जाधव, श्लोक लगड, रुद्राक्ष आरसुळे, नवनाथ डहाळे, कृष्णा ठोकळ, अथर्व पुरी ,वेदांत गणाप्पा, श्लोक कराड, मकरंद मुंडे, भार्गव शिंदे, पियुष भोसले आदी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे
राष्ट्रीय पातळीवर खेळासाठी निवड झालेल्या खेळाडूंची शालेय समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यशस्वी खेळाडूच्या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मार्गदर्शक क्रिडाशिक्षक सूर्यकांत घोलप यांचे ही राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.