ज्ञानकुंभ सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न*

🔷 संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभाग येथे शिक्षण महर्षी कै. विठ्ठलराव तांदळे सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ज्ञानकुंभ सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न*

🔷 संस्कार शाळेतील विद्यार्थी नक्कीच देशपातळीवर नावलौकिक मिळवतील – शुभम बोराडे

बीड/परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क–  संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभाग येथे शिक्षण महर्षी कै. विठ्ठलराव तांदळे सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ज्ञानकुंभ सप्ताह अंतर्गत संस्कार प्राथमिक शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्याच्या विविध कलागुणांना व त्यांची बौद्ध्दिक पातळी उंचावण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह अंतर्गत आयोजित या स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न झाले.

या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंत, लावणी सम्राट, कलर्स मराठी आयोजित ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे प्रथम उपविजेता तसेच बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री शुभम बोराडे सर, तर अध्यक्ष म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे सर, पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे सर, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट श्री लखन परळीकर सर, पद्मावती शिक्षण संस्थेच्या सहसचिव तसेच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती प्रेमीला तांदळे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी तांदळे मॅडम, श्रीमती तिडके मावशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी, परळी भूषण, आदर्श शिक्षक कै. विठ्ठलराव तांदळे सर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई बैठक व्यवस्था, आकर्षक अशी मंडप व्यवस्था ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

यावेळी लावणी सम्राट शुभम बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, ” शाळेने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. अश्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक विकास होऊन तो नक्कीच देशपातळीवर नावलौकिक मिळवील “.

यावेळी त्यांनी शाळेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच शुभम बोराडे यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन विद्यार्थ्यासाठी लावणी सादर केली.

या कार्यक्रमचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीमती चौडे मॅडम तर प्रास्ताविक श्री जगताप सर तर आभार श्री कांगणे सर यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.