सप्तशृंगी देवी, घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ मंदिर विकास आराखड्यात 531 कोटी रुपये मंजूर.

🔷 वणी गडावर संरक्षण जाळी, डोम बसवण्यासाठी, 🔷    श्रीक्षेत्र घृष्णेश्वर  १६ कोटींचा वाढीव निधी वेरुळ येथील वळण रस्ता प्रस्तावित  🔷 परळीत लाइट अँड साउंड शो,इतर 92 कामांना मंजुरी.

मुंबई- सोमवारी मुंबईत राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्या संदर्भातील महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. यामध्ये बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ विकासासाठी २८६.६८ कोटी, औरंगाबाद येथील वेरूळ येथील श्रीक्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रासाठी १६३ कोटी आणि नाशिक येथील श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या आराखड्यासाठी ८१.८६ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

मुंबईतील या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रशांत बंब, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आदी उपस्थित होते. तर ऑनलाईन पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय हे छत्रपती संभाजीनगरहून उपस्थित होते.

नाशिकच्या वणी गडावर  संरक्षण जाळी, डोम बसवणार

श्री सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्र विकासासाठी ८१.८६ कोटींचा प्रस्ताव होता.  आराखड्यात स्वच्छतागृह बांधणे, डोम बसवणे, दरड कोसळण्यापासून संरक्षणात्मक जाळी बसवणे आदी विविध कामांचा समावेश आहे. तर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथें लाइट अँड साउंड शो, सह ईतर सुमारें ९२ कामांना विकास आराखड्यात नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या वेळी आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाइट अँड साउंड शो करण्यात येणार आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील वळणं रस्त्याच्या बांधकामासाठी १६ कोटींचा वाढीव , वेरूळ लेणी क्रमांक एक ते महादेव मंदिर हा नवीन रस्ता १.६५० किमी लांबीचा आहे. त्यासाठी २७.५८ कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याचा समावेश या आराखड्यात केला. तसेच बांधकामासाठी १६ कोटींचा वाढीव निधी यानुसार १६३ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा मंजूरकरण्यात आला .