बँक खाते हॅक करून १६ हजार कोटींचे व्यवहार,
ठाणे: पेमेंट गेटवे सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे बैंक खाते सायबर गुन्हेगारांच्या टोळीने हॅक करून वेगवेगळ्या बँक खात्यांमधून सुमारे १६ हजार १८० कोटींचे व्यवहार केले आहेत, तर २५ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने रविवारी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही फसवणूक बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. परंतु, ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सदरील प्रकरण उघडकीस आले. या तक्रारीच्या आधारे ठाणे सायबर क्राईम विभागाने नौपळा पोलीस ठाण्यात 6 ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सदर तक्रारीनुसार तक्रारीनुसार चार महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिल 2023 मध्ये कंपनीचे पेमेंट गेटवे खाते हॅक करण्यात आले आणि त्यातून सुमारे 25 कोटी रुपये काढल्याचाही आरोप आहे. या तपासादरम्यान सुमारे 16 हजार 180 कोटीची उलाढाल झाल्याची माहिती उघड झाली आहे.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून या टोळीने भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.