एअर इंडियाची 14 ऑक्टोबर पर्यंत इस्रायलची उड्डाणे रद्द

🔷 युद्धाचा आज चौथा दिवस,
🔷 इस्रायल आणि हमास मधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षेसाठी निर्णय.

नवी दिल्ली – हमास आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या युद्धा पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

एअर इंडियाने सोशल मीडिया वेबसाइटवर , ‘प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी, तेल अवीवची आमची उड्डाणे 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत बंद राहतील. या कालावधीत, आम्ही कोणत्याही फ्लाइटमध्ये निश्चित आरक्षण असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. असेही म्हटलं आहे. एअर इंडियाची आठवड्यात तेल अवीवसाठी 5 उड्डाणे आहेत.सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी दिल्लीहून तेल अवीवसाठी उड्डाण करते.

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध शनिवारी सुरू झाले, जे दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. रविवारी झालेल्या युद्धात आपले 30 सैनिक मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. हमास ने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 5 हजार रॉकेटने हल्ला केला होता. गत दोन दिवसात

गाजा,पॅलेस्टाईन भागात युद्ध चिघळल्याने परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे.