
दहशतवाद
नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय नामक प्रतिबंधित दहशतवादी संघटनेविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी सहा राज्यांत धाडी टाकल्या.
गतवर्षी जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौन्याशी संबंधित प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मोदींच्या बिहार दौऱ्यात गोंधळ घालण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा पीएफआयवर आरोप आहे. याप्रकरणी बिहार पोलिसानी गुन्हा दाखल केला होता. एनआयएने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेत बुधवारी महाराष्ट्र,तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या सहा राज्यांमधील १२ ठिकाणी धाडी टाकल्या. राजस्थानचे टोंक, कोटा, गंगापूर, दिल्लीतील हौज काजी, बल्लीमारान, उत्तर प्रदेशातील लखनौ, मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणीदेखील धाडी टाकण्यात आल्या.
केंद्र सरकारने दहशतवादी कारवायांमधील कथित सहभाग आणि इसिस, लश्करसारख्या कुख्यात दहशतवादी संघटनांसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून प पीएफआय आणि तिच्याशी संबंधित या आठ संघटनांवर गतवर्षी सप्टेंबर नि महिन्यात पाच वर्षांची बंदी घातली होती. पीएफआय राष्ट्रीय सुरक्षेसाठी स धोकादायक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

