श्री रेणुकामाता चे नवरात्री मध्ये रात्री दहापर्यंत घेता येईल दर्शन

◾पूर्वी नियमित वेळ रात्री 8.30 पर्यंत

नांदेड/माहूर- एम एन सी न्यूज नेटवर्क-माहूरगडावरील श्री रेणुका देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर शक्ती पिठास लाखो भाविक भक्त भेट देत असतात. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उत्सव काळात मंदिराच्या पायऱ्यांवर दिवे, कापूर लावण्यास बंदी घातली आहे. एरवी सकाळी ६ ते रात्री साडेआठपर्यंत दर्शन घेता येते. पण उत्सव काळात पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले असेल असं मंदिर प्रशासन द्वारे माहिती होत आहे.

नियोजनच्या दृष्टीने सहायक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. यात विविध विभागाकडून नवरात्रोत्सवासाठी केलेल्या तयारीचा विभागवार आढावा घेतला व आवश्यक असलेल्या सूचना दिल्या. श्री रेणुका देवी संस्थानने भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांना मुखदर्शनासाठी मोठ्या एलसीडीची व्यवस्था केली आहे. तसेच नऊ दिवस महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव, व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली. नगरपंचायत कार्यालयाने वाहनतळ, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, तर नऊ दिवस २४ तासांकरिता नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड यांनी