◾ मंत्री भुसे बरोबर बैठक झाली,बैठकीनंतर राज ठाकरे यांनी दिली माहिती.
मुंबई -एमएनसी न्यूज नेटवर्क टोल नाक्यावर पिवळा रेषे एलो लाईनच्या 300 मीटर अंतरापेक्षा पुढे वाहनाची रांग लागली तर रेषेच्या पुढील सर्व वाहनांना टोल शिवाय सोडले जाईल तसेच वाहन चालकांचा टोल नाक्यावर चार मिनिटापेक्षा अधिक वेळ जर रांगेत जात असेल तर टोल माफ केला जाईल. नुकतेच मंत्री भुसे बरोबर राज ठाकरे यांची बैठक झाली या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना माहिती दिली.
मुंबई शहरात च्या प्रवेशाच्या पाच ठिकाणी पुढील पंधरा दिवस सरकार आणि मनसेकडून कॅमेरे लावून वाहनाची मोजमाप आणि नोंद घेतली जाणार आहे मुंबई परिसरातील ठाण्यात झालेले टोलवाड मागे घेण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत देत असल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत एकूणच राज्यातील टोल वसुली आणि त्या अनुषंगाने उपस्थित झालेला अनेक प्रश्नावर बैठक घेतली होती. बैठकीत शुक्रवारी सकाळी राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मंत्री भुसे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.