विश्वचषक 2023 भारताने पाकिस्तानला आठव्यांदा नमावले

🔷 सात गाडी राखून विजय

अहमदाबाद : भारताने पाकिस्तानच्या संघाला आठव्यांदा धुळ चारली.भारताने पाकिस्तानवर या सामन्यात वर्चस्व राखले. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि पाकिस्तानला १९१ धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला आणि शुभमन गिलने संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण तो १६ धावांवर बाद झाला. विराट कोहलीही १६ धावांवरच तंबूत परतला. पण रोहित शर्माने यावेळी कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आणि संघाला सात गाडी राखून विजय विजय मिळवून दिला. पण या विजयानंतर भारतीय संघाला अजून एक गुड न्यूज मिळाली आहे. कारण या सामन्यापूर्वी भारतीय संघ हा गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. भारताचे या सामन्यापूर्वी चार गुण होते. यावेळी पहिल्या स्थानावर न्यूझीलंड सहा गुणांसह आणि दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ चार गुणांसह होता. पण या विजयानंतर भारतीय संघाला दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे सहा गुण झाले आहेत. यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे समान ६ गुण झाले आहेत. पण भारतीय संघाने पाकिस्तानवर मोठा विजय साकारला. त्यामुळे भारताचा रन रेट हा न्यूझीलंडपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. त्यामुळे या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे आणि टीम इंडियासाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असेल.
IND vs PAK सामन्यापूर्वी मोदी स्टेडियमजवळ क्रिकेट चाहत्यांची गर्दी

भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाडींवर दमदार कामगिरी केली आहे. हा विजय भारतासाठी सर्वात मोठा असेल. कारण या सामन्याचे सर्वात जास्त दडपण भारतीय संघावर होते. पण भारताने या सामन्यात विजय मिळवला आणि त्यामुळे त्यांच्यावरील अन्य सामन्यांचे दडपण आता कमी झाले असेल.