परळीच्या शिवराज स्वामी यांचा प्रथम, सिरसाळा येथील वर्षा जाधव यांचा दुसरा तर,परळीतील मिनाक्षी जाधव यांचा तिसरा क्रमांक.
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- ॲड.माधव आप्पा जाधव मित्र मंडळ आयोजित गौरी सजावट स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले.या स्पर्धेमध्ये सहाशे पंचवीस स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता मतदार संघातील विविध भागातून या नोंदणीला दोनच दिवसात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये विविध संदेश देणारे उत्कृष्ट देखावे स्पर्धकांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून मित्र मंडळाला पोहोचवले होते प्रामुख्याने यामध्ये झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा, किल्ला देखावा, बाईपण भारी देवा,पंढरीची वारी, अंगणवाडी देखावा यासह अनेक धार्मिक सामाजिक संदेश देणारे देखावे स्पर्धकांकडून सादर करण्यात आले.
यामध्ये परळी येथील शिवराज स्वामी यांनी साकारलेला किल्ल्याच्या देखाव्याचा पहिला क्रमांक,सिरसाळा येथील वर्षा जाधव यांचा पंढरीची वारी देखाव्याचा दुसरा क्रमांक तर,परळी येथील मिनाक्षी जाधव यांनी साकारलेला झाडे लावा-दुष्काळ हटवा, असा संदेश देणाऱ्या देखाव्याला तिसरा क्रमांक देण्यात आला असून विशेष उत्तेजनार्थ म्हणून ममदापूर येथील रूपाली कदम यांचा अंगणवाडी देखावा,घाटनांदूर येथील रितेश पाटील यांचा बाई पण भारी देवा,गाढे पिंपळगाव येथील मोनिका राडकर यांच्या चंद्रयान – जी २० देखाव्याचे क्रमांक काढण्यात आले आहेत.
सर्व विजेत्यांचे ॲड.माधव आप्पा जाधव मित्र मंडळाकडून अभिनंदन केले गेले आहे.पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ७००१,५००१,३००१ असे रोख रकमेचे बक्षिस व प्रशस्तीपत्र,तर विशेष उत्तेजनार्थ तिन्ही स्पर्धकांना प्रत्येकी १००१ रू. बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. उर्वरित सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र घरपोच दिले जातील.दरम्यान परिसरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी ॲड.माधव आप्पा जाधव मित्र मंडळ कटिबद्ध असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले असून गौरी सजावट स्पर्धेला अल्पावधीतच दिलेल्या प्रतिसदाबद्दल सर्व स्पर्धकांचे आयोजकांनी आभार व्यक्त केले आहेत