चिपळूण जवळ गर्डर  लांचर सह पुलाचा काही भाग कोसळला.

मुंबई -गोवा महामार्गाचे पुन्हा बेहाल, 

रत्नागिरी /चिपळूण- मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा संपण्याचा नाव घेत नसून चिपळूण शहराजवळील बहादूर शेख नाका जवळ  सुरू असलेल्या मुंबई- गोवा मार्गाच्या उड्डाणपूलाचे गर्डर खचले होते तर काही ठिकाणी तडे गेले होते. सोमवारी सकाळी पुलाच्या काही भागासह कोसळला . दुपारी तीनच्या सुमारास पुलाचा काही भाग अचानक कोसळला त्यामुळे मोठी पळापळ झाली.

चिपळूण शहरा जवळ बहादूर शेख नाका ते प्रांत कार्यालय पर्यंत उड्डाणपूल होत आहे, मुंबई – गोवा महामार्गावर महामार्गाच्या चौपदीकरणचा  मोठा भाग आहे.  या पुलासाठी एकूण 46 पिलर उभारण्यात आले होते.  बहादूर शेख नाका जवळ पिलर वर गार्डर  चढवण्याचे काम सुरू होते.  मात्र नव्याने चढवलेले गर्डर सोमवारी सकाळी आठ वाजता मोठ्या प्रमाणात जमिनीत खचले.  त्यामुळे मोठा आवाजही झाला.  दुपारी तीनच्या सुमारास पुलावर असलेला  गर्डर लॉन्चर सह नवीन पुलाचा काही भाग कोसळला.  बहादुर शेख नाक्याजवळ ही मोठी मोठा गोंधळ उडाला, नागरिकांनी तेथून पळ  काढला .  दरम्यान बहादूर शेख नाक्यावर प्रशासनाची यंत्रणा दाखल झाली असून बघ्यांची ही मोठी गर्दी जमली आहे.  सातत्याने मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे चर्चेत असताना आता नवीन होत असलेल्या महामार्गाच्या पुलाचे गर्डर खचल्यामुळे वाहतूकिवर मोठा परिणाम झाला आहे.  मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.  दुपारी काही ठिकाणी पोलीस यंत्रणेची मदत घेऊन वाहतूक सुरळीत करणे सुरू असल्याची माहिती मिळत आहे.