तेली समाजाच्या दांडिया महोत्सवाचे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

सार्वजनिक दांडीया उत्सव-

दांडिया महोत्सवास महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली…

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- दि.१६ येथील तेली समाजाच्या वतीने नवरात्री निमित्त तेली समाज सार्वजनिक दांडीया उत्सव समितीच्या वतीने दांडीया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दांडीया उत्सवाची सुरुवात सायंकाळी 7 वाजता परळीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष तथा परळी नगर परिषदेचे माजी माजी नगराध्यक्ष मा. श्री. बाजीरावजी भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . या कार्यक्रमात समाजातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या दांडिया उत्सव समितीचे अध्यक्ष पवन फुटके व शनिमंदिर चे सदस्य चंद्रकांत उदगीरकर,वैजनाथ कोल्हे, संगमेश्वर फुटके, प्रा. प्रवीण फुटके , शिवशंकर जठार आदी व्यासपीठावर उपस्थित होते केले आहे.

श्री. वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनि मंदिरात तेली समाजाच्या वतीने गेल्या वर्षापासून दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा दांडिया उत्सवाचे दुसरे वर्षे आहे. नवरात्री निमित्त तेली समाज सार्वजनिक दांडीया उत्सव समितीच्या वतीने दांडीया उत्सव २०२३ चे आयोजन १६ ते २३ आँक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवात महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विमान प्रवास, द्वितीय स्मार्ट वाँच, तृतीय ब्लुटूथ व इतर मोठ्या प्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आले आहे. या दांडीया उत्सवाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर फुटके यांनी केले.
या दांडिया महोत्सवात मोहन राजमाने, अतुल बेंडें, शिवराज सोनटक्के, राहुल क्षीरसागर, ईश्वर राऊत, सोमनाथ वाघमारे,अशोक रोकडे,सचिन लासे, सतिष फुटके, राजकुमार भाग्यवंत,शंकर कौले,प्रकाश नखाते यांच्यासह समितीचे सर्व सदस्य शनैश्वर महिला मंडळ व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.