मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर 17 ते 19 आणि 26 ऑक्टोबर दुपारी 12 ते 1 या वेळेत वाहतूक बंद

मुंबई/ पुणे:-यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून १७ ते १९ आणि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

१७ ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगदा कि.मी ४७/९०० व लोणावळा कि.मी. ५०/१०० येथे, १८ ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी कि.मी. ४४/८०० व खालापूर कि.मी. ३३/८००, १९ ऑक्टोबर रोजी ढेकू गाव कि.मी. ३७/८०० व कि.मी. ३७, २६ ऑक्टोबर रोजी खंडाळा बोगदा कि.मी. ४७ / १२० तर खोपोली एक्झीट कि.मी. ३९/९०० वर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू राहणार आहे. काम पुर्ण झाल्यावर दुपारी १. वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

१० अक्टोबर ला देखील घेण्यात आला होता ब्लॉक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १० ऑक्टोबर रोजी ब्लॉक घेण्यात आला होता. एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला. दुपारी १२ ते २ या कालावधीमध्ये हा ब्लॉक घेण्यात आला. १५ ऑक्टोबर रोजीही या . मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या काळामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.