उत्तराखंड नंतर महाराष्ट्रात सातारा हालले

भूकंपाचे धक्के-

सातारा : भारतातसह जगभरातील अनेक देशांत सातत्याने भूकंप जाणवतं आहेत. नुकतेच उत्तराखंड सह राज्या नंतर दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्याला रात्री भूकंपाचे धक्के जाणवले आणि जमीन थरथरली. रात्री ११ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. हा भूकंप ३.३ रिश्टल स्केलचा होता. धक्का सौम्य स्वरूपाचा होता त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.

कोयना धरण क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवतं असतात.सातारा जिल्हा हा नेहमीच भूकंपप्रणव क्षेत्र राहिला आहे. काही वर्षांपूर्वी भूकंपाच्या धक्क्याने हानी झाली होती तेव्हापासून तिथे अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवल्यावर नागरिकांत धावपळ उडते.रात्री ११ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. हा भूकंप ३.३ रिश्टल स्केलचा होता. धक्का सौम्य स्वरूपाचा होता त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.

भारतातसह विविध देशांमध्ये सातत्याने भूकंपाच्या मालिका सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात अफगाणिस्तानमध्ये भीषण भूकंप झाल्याने सुमारे ४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारतातही मोठ्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. काल सातारा येथील भूकंपाच्या आधी उत्तराखंडमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले होते. सकाळी ९ वाजून ११ मिनिटे आणि ४० सेकंदांनी भूकंपाचा तेथे जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर ४.० इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे.