सोलापुरात ६ कोटींचे ड्रग्ज पकडले,दोन आरोपीं ताब्यात

ड्रग्ज/

🔷 सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

सोलापूर/एम एन सि न्यूजनेटवर्क- जिल्ह्यातील चिंचोळी येथील ड्रग्ज फॅक्टरी उघडकीस आणल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गवरील मोहोळ तालुक्यातील देवडी फाटा येथे पुन्हा ड्रग्ज पकडले आहे.
दोन आरोपीकडून ३ किलो १० ग्रॅम इतके सहा कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी पकडले. दत्तात्रय लक्ष्मण घोडके आणि गणेश उत्तम घोडके (दोघेही रा. औंढी, ता. मोहोळ) असं अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.