पूर्व तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन !
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-
तालुक्यातील दिव्यांगांसाठी खा.प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण मंत्रालय, तसेच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिव्यांग पूर्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना निःशुल्क सहायक साधनांचे वितरण उद्या शुक्रवारी (ता. २०) करण्यात येणार आहे. तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
दिव्यांगांना सहाय्यक ठरणारी उपकरणे निःशुल्क उपलब्ध व्हावीत,त्यांचे जीवन कष्टमुक्त व्हावे या हेतूने खा.प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकार आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबविला होता. पूर्व तपासणी शिबिराअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साहित्याचे मोफत वितरण करण्यासाठी खा.प्रितमताई सध्या तालुकानिहाय कार्यक्रम घेत आहेत, याचाच एक भाग म्हणून परळी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आज शुक्रवारी सकाळी १० वा. उप जिल्हा रूग्णालयातील प्रांगणात साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
🔷 तालुक्यात २२५ लाभार्थी ठरले पात्र
तालुक्यात आयोजित केलेल्या पूर्व तपासणी शिबिरात एकूण २२५ लाभार्थी पात्र ठरले होते. पात्र लाभार्थ्यांना व्हील चेअर, तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, कुबडी, सुगम छडी, कृत्रिम हाथ आणि पाय, स्मार्ट फोन, ब्रेल किट, रोलेटर असे विविध सहाय्यक उपकरण वितरित करण्यात येणार आहेत. दिव्यांगांना वितरित करावयाच्या सहायक साधनांमुळे त्यांचे जीवन कष्टमुक्त होण्यास मदत होणार आहे. वितरण सोहळ्यास दिव्यांग बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
••••