टायर फुटल्याचे आणि वायरिंग चे स्पार्किंग झाल्याचे कारण पुढे
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क – लातूर- परभणी शिवशाही बस परळी मार्गे परभणी कडे जात असताना शहरातील शिवाजी चौकादरम्यान बसला अचानक आग लागली. शुक्रवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान सदरची घटना वरदळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौका नजीक घडली.
धावत्या बसणे अचानक पेट घेतल्याने प्रवासी मात्र भांबाऊन गेले सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले . प्रथम दर्शनी वायरचे स्पार्किंग आणि टायर फुटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बसमधील प्रवाशांना वेळीच बाहेर पडता आल्यामुळे जीवित हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब धाऊन आले. त्यांनी आग विझवण्याचा ऑटोकाट प्रयत्न केला. दरम्यान बघ्याची मोठी गर्दी चौकात झाली होती. मात्र बसचा बराचसा भाग जळून खाक झाला.