पुणे- दिल्ली अकासा विमानात बॉम्बची अफवा

विमानाणे सुमारें पाऊण तास हवेंत घिरट्या घेतल्या.
मुंबईत आपात्कालीन लँडिंग.
◾बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाला रुग्णालयात करण्यात आले दाखल.

अकासा एअरलाईन – Akasa Air

मुंबई– विमान प्रवासासाठी आता नवनवीन एअरलाइन्स दाखल होत आहेत. त्यांत अकासा एअरलाईन प्रवासी विमानसेवा देण्यासाठी दाखल झाली आहे.अकासा एअर लाईन च्या पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे शुक्रवारी रात्री मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वास्तविक, टेकऑफनंतर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले. काळात विमान सुमारे 45 मिनिटे हवेत घिरट्या घालत होते.

मुंबई येथें छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दुपारी 12.42 वाजता हे विमान उतरले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमानांत 6 क्रू सदस्य आणि 185 प्रवासी होते विमान तपासात पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने विमानातील प्रवाशांच्या सामानाची झडती घेतली. दरम्यान आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा करणाऱ्या या प्रवाशाला विमान उतरल्यानंतर छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. फ्लाइटमध्ये प्रवाशासोबत असलेल्या एका नातेवाईकाने छातीत दुखत असल्याने औषध घेतल्याचे पोलिसांना सांगितले. अकासा एअरलाइन्सने एका निवेदनात या घटनेला दुजोरा दिला आहे.