नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कुंकुमार्चन कार्यक्रमाचे आयोजन

बालकिर्तनकार ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांचे होणार कीर्तन
बीड/परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क- नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सव 2023 च्या निमित्ताने  आज रविवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सौ. राजश्रीताई धनंजय  मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंकुमार्चन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात बालकिर्तनकार ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांचे सकाळी 9 ते 10 या वेळेत किर्तन होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.
  1. नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात   राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. राजश्रीताई मुंडे यांच्या उपस्थितीत औद्योगीक वसाहतीच्या सभागृहात  रविवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. कुंकुमार्चन आयेजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात  बालकिर्तनकार ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांचे किर्तन सकाळी 9 ते 10 या वेळेत  होणार आहे. दरम्यान, कुंकुमार्चन कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य हे संयोजकाच्या वतीने देण्यात येणार  असून परळी शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन बियाणी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.