ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत
बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – दि.22- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव 22 ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील बाबारामदेव मंदिराच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते. विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आले.
पथसंचलन पथकाने सर्वांचे लक्ष वेधले तर संचलनादरम्यान राष्ट्रप्रेमींनी ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.हे पथसंचलन बाबारामदेव मंदिर सभागृह येथुन सुरू होऊन पुढे राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक,कृषी उत्पन्न बाजार समिती,स्टेशन रोड,महर्षी वाल्मिकी चौक,उड्डाण पूल,पद्मावती गल्ली बाबाराम देव मंदिरात संचलनाची सांगता करण्यात आली.या संचलनासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
