पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या गोपीनाथ गडावरील देवी मंदिरात होमहवन

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क -दि. २२। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या सोमवारी गोपीनाथ गडावर असलेल्या देवीच्या मंदिरात महानवमी निमित्त होमहवन व पूजा संपन्न होणार आहे, याप्रसंगी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे.

गोपीनाथ गड येथे तूळजापूरची भवानी आई, कोल्हापूरची अंबाबाई आणि माहूरची रेणूकाई या तीनही देवीचे मंदिर पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम आकर्षक आहे. दरवर्षी येथे नवरात्रोत्सव मोठया उत्साहात आणि थाटात साजरा केला जातो. शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त आश्विन शुध्द नवमी म्हणजे सोमवार २३ ऑक्टोबर रोजी गोपीनाथ गड (पांगरी) येथे देवीच्या मंदिरात सकाळी १० वा. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते विधियोक्त पूजा व होम हवन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर महाआरती होणार आहे, याप्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केलं आहे.