PC -X, IT
सरदार ऑफ स्पिन..!
भारताचे माजी कर्णधार क्रिकेटपटू उत्कृष्ट गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षाचे होते.
भारताच्या वतीने खेळतांना सुमारें ७७ आंतराष्ट्रीय सामने खेळत त्यांनी २७३ बळी घेतले होते.बिशनसिंग बेदी त्या काळातील सर्वोत्तम डावखुरे फिरकी गोलंदाज होते. बेसन सिंग बेदी यांनी बावीस कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्वही केलं होतं.
१९६७ ते १९७९ पर्यंत क्रिकेटच्या मैदानात ते सक्रिय होते भारताकडून ३७ कसोटी सामने आणि २६६ बळी त्यांनी घेतले होते. भारताकडून १० वनडे सामने देखील ते खेळले होते. या वनडे सामन्यात त्यांनी ७ बळी घेतले. भारतीय फिरकी गोलंदाजीचा पाया रचन्या साठी त्यांची मुख्य ओळख असून दरम्यान त्यांच्या जोडीने बी एस चंद्रशेखर, ईरापल्ली प्रसन्ना, आणि एस व्यंकटराघवन यांनी एक काळ गाजवला आहे. या फिरकीपटूंनी भारताच्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.