पश्चिम रेल्वेच्या १०० हून अधिक गाड्या विलंबाने धावणार.
मुंबई /दि २३ : सद्यस्थितीत पश्चिम रेल्वे मार्गावर घेण्यात येणारे ब्लॉक आणि उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्या याचा फटका मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. पश्चिम रेल्वेवर खार – गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. या कामामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर बहुतांश लोकल रोज विलंबाने धावत आहेत. यामध्ये मंगळवार, २४ ऑक्टोबरनंतर या मार्गावरील जोडणीचे मुख्य काम सुरू होणार असल्याने रोज किमान १५० ते कमाल ४०० लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. याच वेळेत रोज ३०० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल होणार आहेत.
पश्चिम रेल्वेने खार-गोरेगाव सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. ८.८ किमीचे काम ७ ऑक्टोबरपासून सुरू झाले
असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या मार्गावरील प्रवाशांना, विशेषतः सामान्य मुंबई उपनगरीय विभागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे भविष्यात अतिरिक्त रेल्वे सेवा वाढवून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. मात्र,
अनेक अडचणीचा सामना
धावपळीच्या सकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळेसह दुपारच्या सत्रातील लोकल फेऱ्या विलंबाने धावत असून गेल्या काही काळात पश्चिम रेल्वेच्या धीम्या व जलद लोकल सुमारे १५ २० मिनिटे उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मोठा खोळंबा होतो आहे. दुसऱ्या बाजूस लोकलमध्ये उद्घोषणा यंत्रणा आहे, पण त्याचा वापर होत नाही तर लोकलचे नियोजित फलाट अचानक बदलणे, यामुळे सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.