🔷 अश्विन शु. प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत अंबा आरोग्य भवानी डोंगरतुकाई येथें प्रसाद वाटप.
बीड/परळी वैद्यनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- दि.24 – महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब व नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैद्यनाथ येथील प्रसिद्ध अंबा आरोग्य भवानी डोंगरतुकाई येथे अश्विन शु. प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम अविरतपणे सुरू होता.
या उपक्रमात नाथ प्रतिष्ठान चे सचिव नितीन (मामा) कुलकर्णी, अंबा भवानीचे परम भक्त सर्वश्री महावीर नाना महालिंगे, रमेश बुद्रे, शिवरत्न (पप्पू) शेटे, ओम वाघमारे, शशीभाई बिराजदार, जितेंद्र नव्हाडे, शिरीष राजूरकर, नितीन देशपांडे, अक्षय गायकवाड, रंगनाथ सावजी, डॉ. आनंद टिंबे, भूषण आंबेकर, प्रशांत पोहणेरकर, हंगरगे सर, पापा सर देशमुख, शैलेश फुलारी, शिवा सोरडगे, दत्ता घुले, हनुमान गित्ते, सुनील गित्ते, आदी भक्त मंडळी या नवरात्री मध्ये अंबाबाईच्या गडावर घटी बसून (मुक्कामी राहून) येणाऱ्या भाविकांच्या सेवेकरिता प्रसाद वाटपाच्या नियोजनात सहभागी होते.
पहाटे पाच वाजता सुरू झालेले प्रसाद वाटप (खिचडी) संध्याकाळी 4 पर्यंत सुरू राहायचे, घटस्थापनेच्या दिवशी राजगिरा लाडू व अष्टमीला साबुदाणा उसळ वाटप केली जाते. दसऱ्याच्या दिवशी मोतीचुर लाडूचा प्रसाद वाटप करून या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
या उपक्रमास नवमीच्या दिवशी धनंजय मुंडे यांनी भेट देऊन वरील सर्वांचे नाथ प्रतिष्ठाण च्या वतीने आभार मानले.