परळी शहरात श्री वैद्यनाथ पालखी सोहळा उत्साहात

ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र

बीड/परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- विजयादशमीनिमित्त गत अनेक वर्षांपासून असलेला पारंपरिक पालखी सोहळा हर : हर महादेवच्या जयघोषात ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथांची पालखी वाजत गाजत श्री कालरात्री देवी मंदिर मार्गे सीमोल्लंघनासाठी नदी ओलांडून छोट्या टेकडीवर असलेल्या बटू भैरव मंदिराकडे मार्गस्थ झाली.

जुन्या गावभागात श्री वैद्यनाथ पालखीसोबत कालरात्री देवीची ही पालखी निघते.या पालखीच्या स्वागताला ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. या पालखी सोहळ्यात मंदिर विश्वस्त व भाविक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.