बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – शहरातील सर्वांत जुनी आणि राज्याला अनेक नामवंत मल्ल देणारी परळी येथील हनुमान व्यायाम शाळेत विजयादशमी दसरा निमित्ताने प्रति वर्षाप्रमाणे २४ ऑक्टोबर रोजी शस्त्रपूजन करण्यात आले. मराठवाडा विभागात सर्वात प्रथम स्थापन झालेल्या हनुमान व्यायाम शाळेत १९२१ पासून विजयादशमीला शस्त्र पूजन करण्यात येते.
शालेय बाल विद्यार्थ्यांना आरोग्याच्या बाबतीत निरोगी आणि बलदंड शरीर घडावे यासाठी आरोग्यवर्धक शिबीर घेणारी ही व्यायाम शाळा आहे. या शिबिरात विवीध खेळ प्रकार तलवार, ढाल, दांडपट्टा, भाला, काठी, डंबेल्स आदी शिकवले जातात. या विजयादशमीला व्यायाम साहित्यांचे पूजन अध्यक्ष दत्तापा इटके गुरुजी, सचिव देवीदासराव कावरे, नारायण गोपणपाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्रिंबक आप्पा काटकर, सुभाष नानेकर, महात्मा हत्ते. माजी नगरसेवक महादेव ईटके, विकास हालगे, उमाकांत कुरे तसेच व्यायाम शाळेतील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.