वंदे भारत’ मुंबई – गोवा मार्गावरील नवे वेळापत्रक जाहीर.

कोकण- गोवा प्रवास

🔷 आता ‘वंदे भारत’ धावणार आठवड्यातून सहा वेळा.

गोवा/पणजी : सध्या आठवड्यातून तीन दिवस धावनाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला गणेशोत्सव आणि ईतर सामान्य स्थितीत प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ही गाडी इतर अनेक गाड्या पेक्षा सुमारें 2 ते 3 तास कमी वेळेत मुंबई हुन पणजीला पोहोचते. दिवाळीच्या आणि सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे वंदे भारत हाऊसफुल्ल धावत आहे. उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने मुळे रेल्वे विभागाकडून मुंबई ते गोवा रेल्वे मार्गावर नवे वेळापत्रक लागू केले जाणार आहे. दरम्यान वंदे भारत आता आठवड्यातून सहा वेळा धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे उपप्रबंधक तथा जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

सध्या आठवड्यातून तीन दिवस मुंबई- गोवा रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावते आता नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. रविवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी वंदे भारत धावणार नाही.

दिवाळीची सुट्टी तसेच येणारे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे मोठा प्रतिसाद व प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेवर एक नोव्हेंबरपासून गैर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई- गोवा- मुंबई (सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी ) वंदे भारत साठी प्रवाशांना रविवार वगळता आठवड्यातून दररोज प्रवास करता येणार आहे. वर्षभरात कोकण मार्गावरील रेल्वे गाड्यांसाठी दोन वेळापत्रक जाहीर केली जातात. पावसाळी व गैर पावसाळी असे ते वेळापत्रक असते.

मुंबई-गोवा वंदे भारत-एक्स्प्रेस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव स्टेशनपर्यंत धावते. या ट्रेनला आठ डबे असून ५८६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागतो. या मार्गावरील अन्य जलद रेल्वेपेक्षा हा कालावधी ३-४ तासांनी कमी आहे. यामुळे या गाडीला प्रवाशांची पसंती मिळत आहे.
………………………………………………………………

१ नोव्हेंबर पासून वेळापत्रक लागू

१ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या गैर पावसाळी वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेस मुंबईतील सीएसएमटी स्थानकातून पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी १.१५ वा. मडगावला पोहोचणार आहे. तर मडगावहून दुपारी २.३५ मिनिटांनी ही गाडी सुटणार असून रात्री १०.२५ वा. सीएसएमटीला पोहचेल.