अनोखी कीर्तन शैली
🔷 वारकरी संप्रदायावर मोठा आघात.
◾वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास
Babamaharaj Satarkar Death: बाबामहाराज सातारकर यांचं निधन
नवी मुंबई- ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरुळ येथे आज सकाळी त्यांच निधन झालं.बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची अपरिमित हानी झाली आहे. आध्यत्मिक दाखले देत आपल्या खिळवून ठेवणाऱ्या अनोख्या कीर्तन शैलीने त्यांनी देश विदेशातील किर्तन श्रवण करणाऱ्या भक्तांवर जादू केली होती.
बाबामहाराज सातारकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरुळ येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजल्यानंतर नेरुळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबामहाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर उद्या संध्याकाळी पाच वाजता नेरुळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाबामहाराज सातारकर या नांवाने आपल्या वारकरी संप्रदायातील विश्वात जगभर विख्यात असलेले महाराजांचे मूळ नावं नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबामहाराज सातारकर यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला आहे.