इंडिया बेस्ट डान्सर अपेक्षा लोंढे यांची उपस्थिती
बीड /परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क – विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल चे 5 वे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजीत करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 28 आक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता या कार्यक्रमास मा श्री किरण गित्ते साहेब IAS, सचिव, त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते उपस्थित राहणार आहेत. सुपरस्टार महाराष्ट्र बेस्ट डान्सर, इंडिया बेस्ट डान्सर फेम अपेक्षा लोंढे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.
या वार्षिक स्नेहसंम्मेलनाची थीम आहे Rhythm – देशाच्या प्रमुख राज्यातील संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये विद्यार्थ्याकडून प्रदर्शित करणार येणार आहे.
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे पाचव्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सुमारे 700 हून अधिक विद्यार्थी आपल्या नृत्य व गायन तसेच कलेचे प्रदर्शन दाखवणार आहेत. मागील ४ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी प्रधान, प्रार्थना बेहेरे, पुण्यकर आणि प्रथमेश माने, नाळ चित्रपटातील चेत्या (आई मला खेळायला जाऊ दे ना ) प्रसिद्ध डान्सर नेहूल आणि समीक्षा उपस्थिती लाभलेली होती.
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. या स्नेहसंमेलनास विद्यार्थी पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य विठ्ठल तुपे यांनी केले आहे.