अहेरी -महागाव येथील पाच व्यक्ती च्या खुनात सुनेला मदत करणाऱ्या एकास अटक

क्राईम/ गुन्हा आणि गुन्हेगार

गडचिरोली-अहेरी -महागाव महिन्याभरात पाच जणांचे मृत्यू 

गडचिरोली :  महिनाभराच्या आत एकच कुटुंबातील पाच वयस्कांचे गुढ मृत्यू ने गडचिरोली हादरले होते.  अहेरी तालुक्यातील महागाव येथे सुनेने पती, सासू, सासरा, नणंदेसह पतींची मावशी या पाच जणांचा अन्नपाण्यातून विषारी द्रव देऊन खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या प्रकरणात सून व पतीची मामी या दोघी सध्या पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, सुनेच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने तिला विषारी पावडर उपलब्ध करून दिल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यास २६ ऑक्टोबररोजी ताब्यात घेतले आहे.

अविनाश ताजणे (रा. खामगाव, जि. बुलढाणा) असे त्याचे नाव आहे. संघमित्रा कुंभारे हिचा तो पूर्वाश्रमीचा मित्र आहे. महिना भरात महागाव येथील शंकर कुंभारे यांच्या कुटुंबातील पाच जणांच्या गूढ मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यावर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. शंकर कुंभारे (५२), त्यांची पत्नी विजया (४५), विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९, रा. गडअहेरी, ता. अहेरी) मावशी आनंदा उर्फ वर्षा उराडे (५०, रा. बेझगाव, ता. मूल, जि. चंद्रपूर) व मुलगा रोशन कुंभारे (२८) अशी मृतांची नावे आहेत.

संघमित्रा कुंभारे, रोजा रामटेके यांची दहा दिवसाची कोठडीची मुदत संपल्याने २७ रोजी त्यांना व नव्याने अटक केलेला अविनाश ताजणे यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या सर्वांना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा प्रमोद रामटेके (४२) या दोघींनी मिळून हे हत्याकांड केल्याची खळबळजक माहिती तपासात समोर आली. त्या दोघी अहेरी पोलिसांच्या कोठडीत आहेत. चौकशीत रोजा रामटेके हिने गुन्ह्यासाठी वापरलेले विषारी पावडर शालेय मित्र अविनाश ताजणे याने उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. तो हैद्राबादेत सुरक्षारक्षक म्हणून खासगी कंपनीत काम करतो. त्याने ऑनलाइन विषारी पावडर मागितले व ते संघमित्राला दिले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड, पो.नि. मनोज काळबांडे तपास करत आहेत.
महिनाभराच्या आत एकच कुटुंबातील पाच वयस्कांचे गुढ मृत्यू ने गडचिरोली हादरले होते