🔸गळफास लावून जीवन संपवले;
बीड/परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क– मराठा आरक्षणासाठी आता तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. काल अंबाजोगाई येथील गिरवली येथे तरुणाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आपले जीवन संपवले होते. ही या घटनेला 24 तास होण्याआधीच परळी तालुक्यातील गोवर्धन येथे एका युवकाने गळफास घेत आपले जीवन संपवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे.
आरक्षणासाठी अनेक युवक आपले जीवन संपवत आहेत. गंगाभीषण रामराव मोरे, वय 33, राहणार गोवर्धन हिवरा या युवकाने घरात गळफास घेत आपले जीवन संपवले. गांगभिषण यांना 3 छोट्या मुली, पत्नी आणि आईवडील असा परिवार आहे. मराठा आरक्षणाची धग आता ग्रामीण भागात वाढतांना दिसत आहे. गोवर्धन येथील घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे.