परळीत श्री रविंद्रजी पाठक यांच्या श्रीराम कथेचे आयोजन

1 नोव्हेंबर रोजी मंडप उभारणीचा कार्यक्रम

बीड/परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क -चैतन्य गोशाळा ट्रस्टद्वारे द्वादश ज्योतिर्लिंग अंतर्गत पाचवे ज्योतिलिंग परळी वैजनाथ येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीराम कथा प्रवक्ते रवींद्रजी पाठक यांच्या श्रीराम कथेचे आयोजन दि. 2 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2023 या दरम्यान करण्यात आले आहे. ज्योतिर्लिंगाच्या या प्रदीर्घ परिक्रमेत श्रीराम कथेची ही यात्रा पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रवेश करत आहे. यानिमित्ताने या कथेचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. श्री राम कथा परळी वैजनाथ मंदिर प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे. दि.1 नोव्हेंबर 2023 रोजी वैद्यनाथ मंदिर प्रांगणात मंडप उभारण्याच्या कार्यक्रमास 4 वा. सुरुवात करण्यात येणार आहे. श्रीराम कथा श्रवणाचा लाभ परळी व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्रीराम कथा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री महाराजांना आवडणारे अन्नदान घडावे या हेतूने समस्त परळी ग्रामस्थांना नऊ दिवस भोजन प्रसादासाठी सकाळ, संध्याकाळ आमंत्रित करण्यात आले आहे. कथा श्रवणासाठी ज्योतिर्लिंगाच्या समोरच पाच हजार लोकांच्या मांडवाची उभारणी करण्यात येत आहे. वैकल्पिक निवासाची देखील सोय, “चैतन्य गोशाळा ट्रस्ट” मार्फत करण्यात आलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी कथा नियोजन समिती बरोबर संपर्क साधण्यासाठी नागनाथ इनामदार (9822066116), सचिन नाईक (8980039998), हिंदुराव पवार (9890797444) यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या श्रीराम कथेच्या श्रवणाचा लाभ समस्त परळी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन कथा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.