आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघात, दोन ट्रेनच्या धडकेने अनेकांचा मृत्यू.

आंध्र प्रदेश/ विजयनगरम- आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील रेल्वे अपघाताने देश हादरला आहे. या अपघातातील मृतांची संख्या 13च्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर 75 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

दोन गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. यापैकी एक ट्रेन विजयनगरम ते रायगडा, ओडिशाकडे धावत होती. दुसरी ट्रेन विशाखापट्टणम येथून आंध्र प्रदेशातील पलासा येथे जात होती. ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले की, 18 गाड्या रद्द करण्यात आल्या असून सुमारे 22 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.