दान -दनवीर
🔷 शिव नाडर यांनी 2023 मध्ये दररोज सुमारें 5.6 कोटी दान दिले: तर यादीत नाडर अव्वल.
🔷 हुरुन इंडिया फिलान्थ्रोपीच्या यादीत सात महिला
नवी दिल्ली– सरलेले आर्थिक वर्ष 2023 मध्ये आपल्या उत्पन्नातून काही वाटा सामाजिक संस्था आणि इतरांच्या गरजांसाठी उपयुक्त व्हावा या भावनेतून दिलेले दानाची यादी नक्कीच प्रसिद्ध झाली आहे. एडेगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी यादी 2023 गुरुवारी प्रसिद्ध झाली. यामध्ये एचसीएलचे सहसंस्थापक शिव नाडर यांनी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2,042 कोटी रुपयांची देणगी दिली. म्हणजेच त्यांनी दररोज 5.6 कोटी रुपये दान केले. त्यांच्या खालोखाल विप्रोचे संस्थापक-अध्यक्ष अझीम प्रेमजी आहेत, ज्यांनी 1,774 कोटी रुपयांचे दान दिले.
झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ हे सर्वात तरुण दानवीर म्हणून उदयास आले आहेत. निखिल यांनी त्यांचे भाऊ आणि झिरोधाचे सीईओ नितीन कामथ यांच्यासह 110 कोटी रुपयांचे दान दिले. या यादीत 119 देणगीदारांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी 2023 या आर्थिक वर्षात 8,445 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
हुरुन इंडिया फिलान्थ्रोपीच्या यादीत सात महिला
या यादीत सात महिलांचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर रोहिणी नीलेकणी, रोहिणी नीलेकणी फिलान्थ्रॉपीजच्या संस्थापक आहेत. त्यांनी 170 कोटी रुपयांची देणगी दिली. एक काळ असा होता की या यादीत त्या एकट्याच होत्या. रोहिणी यांच्या पाठोपाठ थर्मेक्सच्या अनु आगा आणि कुटुंबाचा क्रमांक लागतो, ज्यांनी 23 कोटी रुपयांची देणगी दिली आणि यूएसव्हीच्या लीना गांधी तिवारी यांनीही 23 कोटी रुपयांची देणगी दिली.
🔷 25 नवीन लोकांचा समावेश
या वर्षी आपली अर्धी संपत्ती दान करण्यासाठी द गिव्हिंग प्लेजवर स्वाक्षरी करणारे निखिल कामथ या यादीतील सर्वात तरुण दानवीर राहिले आहे. यावर्षी, यादीत 25 नवीन प्रवेशकर्ते आहेत, ज्यात इन्फोसिसचे सह-संस्थापक के दिनेश, रमेशचंद्र टी जैन आणि भिलोसा इंडस्ट्रीजचे कुटुंब, ऍक्सेलचे प्रशांत प्रकाश आणि झोहो कॉर्पोरेशनचे वेम्बू राधा यांचा समावेश आहे.