मराठवाड्याच्या ग्लोबल आडगाव चित्रपटाने रचला इतिहास

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

भारत सरकारच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व.
परळीचे भूमीपूत्र डॉ.सिध्दार्थ तायडे व रानबा गायकवाड यांच्या भूमिका

बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – मराठवाड्याच्या  मातीतील अस्सल कलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांचा समावेश असलेल्या ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटाने इतिहास रचना असून भारत सरकारच्या वतीने गोवा येथे डिसेंबर मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ग्लोबल आडगाव हा चित्रपट महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली असून यामुळे सर्वत्र टीम ग्लोबल आडगावचे अभिनंदन व कौतुक होत आहे. या चित्रपटात परळीचे भूमिपुत्र जेष्ठ पत्रकार, लेखक तसेच नाटककार रानबा गायकवाड व प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांच्या भूमिका आहेत.

प्रतिष्ठित गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित “ग्लोबल आडगाव” या उत्कृष्ट मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.या चित्रपटाची निर्मिती शेतकरी पुत्र उद्योजक मनोज कदम, अमृत मराठे यांनी केली असून संत रामदास महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी अभिनय-सहदिग्दर्शन केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.
अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये आणि संदीप पाटील यांच्यासह पाच सदस्यांच्या तज्ञ समितीने 30 चित्रपटामधून या चित्रपटाची काळजीपूर्वक निवड केली होती. जोरदार कथा आणि कलात्मक उत्कृष्टतेमुळे ग्लोबल आडगावला या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात स्थान मिळाले आहे.

या चित्रपटाचे निर्माते उद्योजक श्री.मनोज कदम , दिग्दर्शक डॉ अनिलकुमार साळवे आणि सहनिर्माते अमृत मराठे,सहदिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे,कलावंत रानबा गायकवाड यांचेसह सिल्व्हरओक फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट च्या सर्व कलावंतांचे अभिनंदन होत आहे. प्रदर्शनापूर्वीच गुलाब आडगाव या चित्रपटाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल मध्ये आपला ठसा उमटविला आहे. लवकरच हा चित्रपट सिने रसिकांच्या भेटीला येणार आहे.
महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महोत्सवात चित्रपटाची निवड झाल्याबद्दल डॉ. सिद्धार्थ तायडे व रानबा गायकवाड यांचे अभिनंदन स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे, उपाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे, सचिव विनायक चोथे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. परदेशी, उपप्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये ,प्रा. भगवान मिरकड ,राजकिशोर मोदी,चंदुलाल बियाणी,बाजीराव धर्माधिकारी, भास्कर नाना रोडे,प्रा. दासू वाघमारे, विधिज्ञ दिलीप उजगरे, प्रोफे. संजय जाधव ,अनंत इंगळे ,बालासाहेब इंगळे,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले, प्रा. शंकर शिनगारे, डॉ. बबन मस्के, बा. सो. कांबळे,विकास वाघमारे, यांचेसह सिने नाटय कलावंत संघटनेतील सर्व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.