🔷 आफ्रिका 83 धावांत ऑलआऊट, कोहलीचे 49 वे वनडे शतक,
🔷जडेजाच्या 5 विकेट
कोलकाता – किर्केट सतत मजबूत यष्टी रक्षण, फिल्डग गोलंदाजी आदी जमेच्याबाजू मुळे एकतर्फी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करून वनडे विश्वचषकात सलग आठव्यंदा विजय नोंदवला आहे. यासह भारताने गुणतालिकेत क्रमांक-1 फिनीशही निश्चित केली आहे. म्हणजेच उपांत्य फेरीत भारताचा सामना चौथ्या क्रमांकावरील संघाशी होईल.
भारताने कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या विक्रमी 49 व्या शतकामुळे संघाने 50षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. कोहलीने नाबाद 101 धावा केल्या आणि सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. श्रेयस अय्यरने 77 धावा केल्या.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकांत 83 धावा करून सर्वबाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. मोहम्मद शमीने 2 तर कुलदीप यादवने 2 बळी घेतले. भारताने 20 वर्षांनंतर विश्वचषकात सलग आठ सामने जिंकले आहेत. यापूर्वी टीम इंडियाने 2003 वर्ल्ड कपमध्ये एकामागून एक 8 सामने जिंकले होते.
- विराट वाढदिवशी विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला भारतीय विराट कोहलीने 121 चेंडूत नाबाद 101 धावांची शतकी खेळी केली. त्याने सचिन तेंडुलकरच्या वनडेत सर्वाधिक शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. कोहली आपल्या वाढदिवशी विश्वचषकात शतक झळकावणारा भारताचा पहिला आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला.
कोहलीच्या 49व्या शतकावर सचिन तेंडुलकर म्हणाला- ‘विराट चांगला खेळला, मला 49व्या ते 50व्या शतकापर्यंत पोहोचायला 365 दिवस लागले. मला आशा आहे की तु काही दिवसात 50 शतके ठोकशील आणि माझा विक्रम मोडशील.