मुंबई – पुणे महामार्गावर आज ब्लॉक

वाहतूक मार्गात बदल

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अर्थात यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर चिखले ब्रिज येथे मुंबई वाहिनीवर गर्डर लॉचिंगचे काम महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाकडून गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. या वेळेस पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सकाळी ११ ते दुपारी १.१५ वा. व दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत पूणर्त: बंद राहणार आहे. या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी वळवण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने पनवेल एक्झिटवरून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील करंजाडेमार्गे कळंबोली येथे वळवण्यात आली आहे.

मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने शेडुंग फाटावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करण्यात येतील. तर पुण्याहून मुंबईकडे येणारी हलकी वाहने मुंबई खोपोली एक्झिटवरून वळवण्यात येणार आहे.