मध्य रेल्वे-Central Railway
बिकानेर ते शिर्डी साईनगर ट्रेन क्रमांक ०४७१५ साप्ताहिक उत्सव विशेष * शिर्डी साईनगर ते बिकानेर ट्रेन क्रमांक ०४७१६ साप्ताहिक उत्सव विशेष
मुंबई : वर्षातील परिवारातील सर्वांसाठी महत्वपूर्ण असलेला मराठी माणसांसाठी दिवाळी, उत्तरभारतीय बांधवांसाठी साठी छट पूजा हे सन आनंददायी आहेत. या सणादरम्यान प्रवाशांची रेल्वे गाड्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे बिकानेर ते साईनगर शिर्डी दरम्यान १४ साप्ताहिक उत्सव विशेष ट्रेन चालवणार आहे. यामध्ये बिकानेर ते शिर्डी साईनगर ट्रेन क्रमांक ०४७१५ साप्ताहिक उत्सव विशेष १८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत (७ फेऱ्या). ही गाडी दर शनिवारी १२.१० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक ०४७१६ साप्ताहिक उत्सव विशेष १९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर (७ फेऱ्या) दर रविवारी साईनगर शिर्डी येथून सायंकाळी ७.३५ वाजता सुटेल आणि बिकानेर येथे तिसऱ्या दिवशी ५ वाजता पोहोचेल.
प्रवाशांच्या सोई साठी या गाड्यांना श्री डुंगेरगढ, राजलदेसर,रतनगड, चुरू, फतेहपूर शेखावती, लक्ष्मणगढ सीकर, सीकर, रिंगास, ढेहर का बालाजी, जयपूर, दुर्गापुरा, सवाई माधोपूर, कोटा, रामगंज मंडी, शामगढ, नागदा, उज्जैन, संत हिरदाराम नगर, भोपाळ, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ आणि मनमाड़ या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. दरम्यान, या गाड्यांचे आरक्षण १० नोव्हेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.