गोपाल टॉकीज कॉर्नर ते अंबेवेस आणि अंबेवेस ते चांदापूर – वैद्यनाथ मंदिर नविन रस्ता प्रकाशमान

शहर सुविधा

🔷 ना.धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीमधून ९ लक्ष रुपये खर्चून बसवले पथदिवे

बीड/परळी वैजनाथ, एम एन सी न्यूज नेटवर्क –
ना.धनंजय मुंडे यांच्या ९ लक्ष रुपये खर्चून विकास स्थानिक निधीमधून गोपाल टॉकीज कॉर्नर ते अंबेवेस आणि अंबेवेस ते चांदापूर – वैद्यनाथ मंदिर नविन रस्त्यावर पथदिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत हे रस्ते प्रकाशमान झाले आहेत.
राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीमधून गोपाल टॉकीज कॉर्नर ते अंबेवेस आणि अंबेवेस ते चांदापूर – वैद्यनाथ मंदिर या नविन रोडवर ९ लक्ष रुपये खर्चून २० पथदिवे बसविण्यात आले आहेत. दीपावली पाडव्याचे औचित्य साधून परळीचे भूमिपुत्र युवा उद्योजक गणेश मुकदम यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हे पथदिवे प्रज्वलित करण्यात आले. अंबाआरोग्य भवानी डोंगरतुकाई देवी आणि ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ मंदिर जाण्यासाठी जुन्या गावभागातील ‘बायपास’ असणारा हा नविन रस्ता अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आहे.चांदापुर,मलकापूर,मालेवाडी, लेंडेवाडी, अंबलटेक, तेलघणा, घाटनांदूर या भागातील शेतकरी बांधवांना दररोज माळवे-दुधदुभते विक्रीसाठी परळीमध्ये यावे लागते.आता या नविन बायपासमूळे जुन्या गावभागातील अरुंद रत्यावर ट्रॅफिक जाम न होता स्वतंत्र मोठा मार्ग निर्माण झाला आहे.
राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या सहकार्यातून जुन्या गावभागातील या नविन बायपासची निर्मिती झाली असून वैद्यनाथ मंदिर व घाटनांदूरकडे जाण्यासाठी वळणरस्ता म्हणून उपयुक्त ठरत आहे.या प्रकल्पामुळे ना.धनंजय मुंडे यांचे सर्वचजण आभार व आनंद व्यक्त करीत आहेत. या रस्त्यावरील पथदिवे परळीचे भूमिपुत्र युवा उद्योजक गणेश मुकदम यांच्या शुभहस्ते पथदिवे प्रज्वलित करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष जाबेरखान पठाण,माजीनगरसेवक वैजनाथ बागवाले, अनिल आष्टेकर, कांता पोहनेरकर,धोंडीराम धोत्रे, उमेश टाले,नितीन बागवाले शशिकांत बिराजदार,राहुल ताटे, श्रीपाद पाठक,चारुदत्त करमाळकर,किरण सावजी,शरद कावरे,ॲड.प्रताप धर्माधिकारी,नितीन राजूरकर, नागेश फडकरी,अभिजीत तांदळे,वैजनाथ जोशी,चेतन बागवाले, रंगनाथ सावजी,अतुल ताटे,सद्दाम पठाण, कंत्राटदार नवाब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.