“यशोदा लघुपट इफी गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये

बीड/परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क -माधुरी अशीरगडे निर्मित व विजया दहिवाळ सहनिर्मित असलेला
“यशोदा” या लघुपटाची निवड यंदाच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गोवा येथील मानाच्या चित्रपट महोत्सवात गोवा विभागातून झाली आहे.या लघुपटाचे चित्रीकरण गोवा येथेच झाले आहे.यशोदा चे कथालेखन आणि  निर्मिती माधुरी अशीरगडे, सहनिर्माती विजया दहिवाळ याची आहे.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गोवा येथील मानाच्या चित्रपट महोत्सवात गोवा विभागातून झाली असून या लघुपटात प्रतिभा मेंढेकर, आसावरी देशपांडे, माणिक मंत्री, सुनंदा काळुसकर.यांनी काम केले आहे. लघुपटाचे संगीत- माधुरी अशीरगडे, प्रतिभा दहिवाळ, शहाणे.डायरेक्टर- प्रवीण चौगुले गायिका-साधना सरगम व प्रतिभा दहिवाळ, शहाणे आदि केले आहे.प्रतिभा दहिवाळ, शहाणे यांनी या आधीही लघुपटास संगीत व गायन केलेले आहे. त्यास ही प्राईज मिळालेले आहेत.

या चित्रपटातील कलाकार सर्व गोव्याचेच आहेत. मेन भूमिकेत रावी किशोर आहेत. डॉक्टरच्या भूमिकेत आपल्या परळीच्या कन्या विजया दहिवाळ आहेत.याचा आपल्या परळी कराना आनंद आहे.
या फिल्म ची शूटिंग ही गोळव्यात झालेली आहे.
फिल्ममध्ये चार वर्षापासून ते साठ वर्षापासूनच्या भूमिका स्त्रियांनीच साकारलेल्या आहेत. व निर्मात्या ही महिलच आहेत.
या लघुपटात आपल्या मराठवाड्यातील विजयाताई ह्या एकट्याच आहेत.लघु चित्रपटाद्वारे  सामाजिक संदेशही दिलेला आहे. जो की, काळजात हात घालतो. आणि  मातृत्वाची जबाबदारी कशी घ्यावी हे दाखवण्याचा प्रयत्न ही केलेला आहे.
आज “गोवा इफी” मध्ये दाखवतयक जात आहे हे विशेष.
सर्वच टिमचे खूप खूप अभिनंदन, आपली परळी कन्या विजया ताई चे विशेष अभिनंदन.