साधना कदम यांचे चित्र प्रदर्शन

उद्घाटक डॉ.प्रा. मिलिंद फडके

कला प्रदर्शन
पुणे- एम एन सी न्यूज नेटवर्क-साधना कदम या चित्रकर्तीचे पहिले चित्र प्रदर्शन (Solo Exhibition) बालगंधर्व कलादालन, पुणे. येथे प्रदर्शित होत आहे. निसर्ग सौंदर्य,जलरंगासह,सुलेखन विविध माध्यमातून तयार केलेली आकर्षक चित्रे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे.

जलरंगासह विविध रंग प्रकारात पानाफुला सह विविध विषय साधना कदम यांनी हाताळले आहेत. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन अभिनवकला महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ. श्री. मिलिंद फडके सर यांचे हस्ते शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वा. होणार आहे.

कला रसिकांना हे प्रदर्शन दि.२४/२५/२६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० या वेळात पहाता येईल.