
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क : इनरव्हिल क्लब च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपाणी गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी परळी दौऱ्यावर येणार आहेत. जागतिक पातळीवर सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या रोटरी इंटरनॅशनल ची शाखा इनरव्हील क्लब आहे, विविध क्षेत्रातील महिला या माध्यमातून सामाजिक कार्यात आहेत.
इनर व्हील डिस्ट्रिक्ट 313 च्या अध्यक्ष सौ. रचना मालपाणी इनरव्हिल क्लब ऑफ परळी च्या वार्षिक अहवाल तपासण्या साठी परळी येथे २३ नोव्हेंबर ला सकाळी १० वाजता येत आहेत.
परळी वैजनाथ शहरात गेले 25 वर्षा पासून इनरव्हिल क्लब सामाजिक कार्य करत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा क्लब भेट आणि वार्षिक अहवाल तपासण्या साठी डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रचना मालपानी येत आहे.
डिस्टीक चेअरमन च्या उपस्थितीत परळी येथे सकाळी आर्य हॉटेल येथे सकाळी 10 वाजता सर्व स्थानिक सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस परळी इनरव्हील क्लब च्या सर्व सदस्यांनी हजर रहावे, असे आवाहन परळी इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष श्रीमती विद्या गुजर यांनी केले आहे.

