◾ आदर्श शिक्षक, आदर्श समाज भूषण आणि मार्गदर्शकेचे प्रकाशन.
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- स्व. वंदना नागनाथजी पारसेवार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्व. वंदनाताईचा द्वितीय स्मृतिदिन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा, आदर्श शिक्षक, समाज भुषण पुरस्कार -23 या कार्यक्रमाचे 26 नोव्हेंबर रोजी आर्य वैश्य सभागृहात परळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आल्याची माहती स्व. वंदना पारसेवार सामाजिक प्रतिष्ठान द्वारे देण्यात आली आहे.
या कार्यक्रमास हिंगणघाट चे आमदार समीर कुनावार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून याप्रसंगी भानुदास वट्टमवार, आर्य वैश्य समाज महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गादेवार, श्री काशी अन्नपूर्णा नित्यसत्रम चे बच्चू विलास गुप्ता, प्रदीप सोपानराव कोकडवार -संघटन प्रमुख आर्य वैश्य महासभा महाराष्ट्र राज्य तसेच सचिनजी लादे सचिव आर्य वैश्य महासभा सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा सोलापूर चे सचिव गोविंदराव बिडवे, नरेंद्र येरावार, विकास डुबे, सूर्यकांत शिरपेवार आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात वंदनाताईचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन, त्यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ
प्रतिष्ठानच्या वतीने समाजाप्रती खूप योगदान असणारे सन्माननीय व्यक्तींचा सन्मान सोहळा ही आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान आदर्श शिक्षक , आदर्श समाज भूषण पुरस्कार 2023 आणि मार्गदर्शकेचे प्रकाशन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास सर्व समाज बांधवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याच आवाहन वंदना पारसेवार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.