जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

🔷 पंकज कुमावत अंबाजोगाईचे नवे अपर पोलिस अधीक्षक

🔷 कविता नेरकरांची राज्याच्या सायबर विभागाच्या पोलिस अधिक्षकपदी नियुक्त

बीड/एम एन सी न्यूज नेटवर्क : सोमवारी राज्याच्या गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार आता पंकज कुमावत यांच्याकडे अंबाजोगाई अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तर अंबाजोगाई येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या कविता नेरकर यांची राज्याच्या सायबर विभागाच्या पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.